अबिद नाईक यांची अमित सामंत यांच्यावर नाव न घेता टीका
⚡सावंतवाडी ता.२०-: राष्ट्रवादित दोन गट पडले. परंतु दुसऱ्या गटाचा जिल्हाध्यक्ष काय करतो ? याचे आम्हाला घेणं देणं नाही, आणि त्यांच आम्ही नावे घेऊ इच्छित नाही. कारण गेल्या चार वर्षात त्यांनी दाखवीलेली क्रियाशीलता ही संपूर्ण जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनुभवलेली आहे, अशी टीका अमित सामंत यांचे नाव न घेता अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबित नाईक यांनी केली आहे.
दरम्यान, आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे. त्यामुळे मी व काका कुडाळकर आम्ही दोघं एकत्र फिरलो, तर कार्यकर्ते आकर्षित होऊन आमच्याकडे येऊ शकतात. आम्हाला त्यात यश मिळेल असा विश्वास आहे, असे यावेळी नाईक यांनी सांगितले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
