Headlines

अजित पवार यांचा वाढदिवस जिल्ह्यात विविध उपक्रमाने होणार साजरा…

अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती: मुंबई- गोवा महामार्गावर वृक्षरोपण

सावंतवाडी ता.२०-:22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस जिल्ह्यात साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.परंतु नियोजित कार्यक्रम होणार आहे यामध्ये जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वह्या वाटप, वृक्षारोपण असे कार्यक्रम होणार आहेत आशी माहिती आज इथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी दिली.

You cannot copy content of this page