जिल्ह्यातील भाजप शिवसेना या मित्रपक्षांना त्रास न देता राष्ट्रवादी पक्ष मजबूत करणार…

अबिद नाईक व काका कुडाळकर यांची माहिती:तर भविष्यात विधानसभेच्या जागेवर दावा करू…

⚡सावंतवाडी ता.२०-: साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्ठी वापरुन येणाऱ्या सहा महिन्यात आठही तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मात्र मित्रपक्ष असलेल्या भाजप व शिंदे शिवसेनेला कोणत्याही त्रास होणार नाही याची दक्षता बाळगून हे प्रयत्न असणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबित नाईक व काका कुडाळकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान भविष्यात आमची संघटना वाढत गेली तर नक्कीच आम्ही एखादा विधानसभेच्या जागेवर दावा करू शकतो असे ते यावेळी बोलताना म्हणाले ते दोघे सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते

You cannot copy content of this page