सावंतवाडी तालुक्यात पावसाने पडझडीच्या घटना…

घर, मागरांचे नुकसान; महसुलकडून पंचनामा

⚡सावंतवाडी ता.१९-:
तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी छोट्या मोठ्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत यात दांडेली येथे घराचे लाकडी वासे मोडून पडवीचे नुकसान झाले तर चराटे येथे घरावर झाड पडून नुकसान झाले दोन्ही घटनाचा पंचनामा महसुल कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला असून तशी नोंद येथील तहसिल कार्यालयात झाली आहे.


सावंतवाडी तालुक्यात दोन दिवस पावसाने आपल्या कार्यक्षमतेत काहीशी वाढ केली आहे. मंगळवारी दिवसभर व रात्रीही धुंवाधार कोसळणाऱ्या पावसाने नदि नाल्यांना पुर आले तालुक्यातील बरिसची सखल भागातील पुले नव्याने बांधल्याने वाहतुकीला अडथळे जाणवले नसले तरी ग्रामीण भागातील काही पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतुक कोंडी निर्माण झाल्याचा प्रकार घडला. यामध्ये होडावडा पुल नेहमीप्रमाणे पाण्याखाली गेला होता. दरम्यान मंगळवारी रात्री चराठे येथील अनंत परशुराम परब यांच्या घरावर झाड शेजारील आंब्याचे झाड उन्मळून पडल्याने त्यांचे घराचे नुकसान झाले तर दांडेली येथील काशिनाथ तुकाराम आरोसकर ह्यांच्या घराच्या पडवीचे लाकडी वासे अतिवृष्टीमुळे मोडून 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. मळेवाड येथे सुरेंद्र रामकृष्ण शिरसाट यांचे घरावर झाड कोसळल्याने सुमारे २ लाख इतके नुकसान झालेले तर राजाराम विष्णू मुळीक यांचे मांगरावर झाड कोसळून सुमारे ६० हजारचे नुकसान झाले. या घटनांचा पंचनामा तेथील महसुल कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला असून तशी नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.
एकूणच तालुक्यातील एकूणच घडामोडीवर तहसीलदार श्रीधर पाटील हे जातीने लक्ष ठेऊन आहेत मंगळवारी रात्रीही त्यांनी तेरेखोल नदी तसेच बांदा परिसराची पाहणी केली. ज्या ज्या ठिकाणी धोक्याची घंटा आहे तेथील यंत्रणेशी त्यांनी अलर्ट राहण्याची सुचना केली आहे.

You cannot copy content of this page