सावंतवाडी येथे उद्या ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर व प्रवेश प्रक्रिया..” यावर मार्गदर्शन’…

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१९-: येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने उद्या गुरुवार, दि.20 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर व प्रवेश प्रक्रिया’ या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेकरिता विकल्प अर्ज भरण्याची फेरी – कॅप राऊंड उद्यापासून सुरू होत असून त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

प्रवेश प्रक्रियेचे विकल्प अर्ज मोफत भरण्याची सोय देखील यावेळी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल. सत्राला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी बस स्थानक ते कॉलेजपर्यंत येण्यासाठी वाहतूक सुविधा कॉलेजतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे._
_तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन कॉलेजतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रा.दीपक पाटील – मोबा. 9421718850 यांचेशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page