वैभववाडी संजय शेळके
रोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या वतीने दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 शाळेला रोटरी क्लबचे सदस्य सूर्यकांत धावले यांच्या वाढदिवसानिमित्त पाण्याचा पाईप व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय रावराणे माजी अध्यक्ष संतोष टक्के शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संजय शेळके शाळा विकास समितीचे अध्यक्षा श्रेया धावडे,प्रा डॉ नामदेव गवळी, प्रशांत गुळेकर, मुख्याध्यापिका दिप्ती पाटील, मनिषा साठे, मुकुंद रावराणे,चोरगे सर सावंत मॅडम, आदी पालक विद्यार्थी उपस्थित होते.
