⚡बांदा ता.१९-: कोकण कला विकास शैक्षणिक संस्था यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
दरवर्षी कोकण कला विकास शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभर विविध ठिकाणी संस्थेच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते.
सावंतवाडीत तालुक्यातील बांदा केंद्र शाळेसह विविध शाळांमधून शैक्षणिक साहित्याचे वाटप करतेवेळी सेवेक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजर सुनिल मोठे,ब्रन्च मॅनेजर सुनिल मोरे, असिस्टंट मॅनेजर विनोद पुरोहित,कोकण विभाग प्रोजेक्ट मॅनेजर प्रथमेश सावंत, मॅनेजर हनुमंत गवस मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये आदि मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले.कोकण विकास संस्थेच्या या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांनी धन्यवाद व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री जे.डी.पाटील यांनी केले.
कोकण कला शिक्षण संस्थेच्या वतीने बांदा केंद्र शाळेत शैक्षणीक साहित्य वाटप…
