कुणकेरी येथील रमेश सावंत यांचे आकस्मित निधन

⚡सावंतवाडी ता.१९-: श्वसनाचा त्रास होऊन चक्कर येऊन घरात पडल्याने रमेश सिताराम सावंत (67) रा. कुणकेरी हे मयत झाले. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना मृत घोषित केले. याबाबतची खबर मंगेश सावंत यांनी पोलिसात दिली असून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

मयत सावंत हे घरी असतांना त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला येतात त्यांना चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले यांना तात्काळ उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात घालवण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी अंतिम त्यांना मृत घोषित करण्यात आले याबाबत कल्पना पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश जाधव व अनिल धुरी यांनी जबाब घेत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

You cannot copy content of this page