उंबर्डे येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी नागरी पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी एस. पी. परब यांची निवड…

तर व्हाईस चेअरमनपदी याकूब बाबालाल नाचरे यांची निवड

⚡वैभववाडी ता.१९ संजय शेळके-: उंबर्डे येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी नागरी पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी एस. पी. परब यांची तर व्हाईस चेअरमनपदी याकूब बाबालाल नाचरे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच उंबर्डे येथे पार उच्चपडली. कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय मुख्याध्यापक अशी श्री. परब यांची तालुक्यात ओळख आहे. तर वीस वर्ष संचालक म्हणून काम करणारे याकुब नाचरे यांचा सहकार क्षेत्रात चांगला अभ्यास आहे. निवडीनंतर दोघांचेही गावात अभिनंदन केले जात आहे.

नुतन संचालक म्हणून एस. एम. बोबडे, विजय आनंदा केळकर, प्रभाकर सखाराम कोकरे, बाबालाल अहमद लांजेकर, हसन दाऊद रमदुल, काशिम बिलाल रमदुल, गौस हसन पाटणकर, अहमद हमीद बोबडे, हनिफा शब्बीर बोबडे, अबिदा रमदुल यांची निवड जाहीर झाली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ. भोगले यांनी काम पाहिले. यावेळी खाडे गुरुजी, उंबर्डे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दळवी, माजी सरपंच एस. एम. बोबडे, रत्नाकर बंदरकर, उमर रमदुल, रमजान बोबडे, अलीबा बोथरे आदी उपस्थित होते.
ही पतसंस्था सर्वसामान्य जनतेसाठी आधारवड बनली आहे. नुतन चेअरमन परब सर व व्हा. चेअरमन नाचरे हे नक्कीच पदाला न्याय देतील असे एस.एम. बोबडे यांनी सांगितले. श्री परब म्हणाले, सर्व संचालक व गावातील सर्वांना विश्वासात घेऊन सहकार क्षेत्रात काम केले जाईल. शेतकऱ्यांना अर्थसहाय तसेच युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. यावेळी श्री खाडे गुरुजी, प्रदीप दळवी यांनी मार्गदर्शन केले. नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

You cannot copy content of this page