अक्षता जैतापकर: तहसीलदारांकडे निवेदन केले सादर
⚡वैभववाडी ता.१९ संजय शेळके-: वैभववाडी शहरातील स्टॉल हटविण्यात येऊ नयेत . या स्टॉलवरच अनेक कुटुंबांचा संसार सुरू आहे. त्यामुळे स्टॉल हटाव मोहीम पुन्हा राबवु नये अशी मागणी माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अक्षता जैतापकर यांच्यासह स्टॉलधारकांनी तहसिलदारांकडे केली आहे. तहसिलदार दिप्ती देसाई यांची स्टॉलधारकांनी भेट घेवुन निवेदन दिले.
शहरातील जुना कोकीसरे रस्त्यासह अन्य ठिकाणी असलेले स्टॉल विकासकामांकरिता फेब्रुवारी महिन्यात नगरपंचायतीने हटविले होते.त्यानंतर त्यांच जागेत पुन्हा स्टाॅल उभारण्यात आले आहेत.यावर नगरपंचायतीने दोन दिवसांपूर्वी तहसीलदार यांना निवेदन देऊन स्टॉलबाबत कारवाई करावी अशी मागणी केली होती.त्यानंतर पुन्हा स्टाॅल हटाव मोहिम राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे.यासंदर्भात सोमवारी स्टॉल धारकांसह माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अक्षता जैतापकर यांनी तहसीलदार यांची भेट घेतली.स्टॉल हटाव मोहिम राबवू नये अशी मागणी केली.
यावेळी स्टॉलधारक राजप्पी रणजित पाटील,नगरसेविका अक्षता जैतापकर,नगरसेवक मनोज सावंत,शिवाजी राणे,सुरेश कर्पे,अंजली शिवगण,यांच्यासह अनेक स्टॉलधारक उपस्थित होते.
फोटो तहसीलदार दिप्ती देसाई यांना निवेदन देताना अक्षता जैतापकर, मनोज सावंत, स्टॉलधारक छाया संजय शेळके वैभववाडी
