⚡वेंगुर्ले ता.१८-: सिधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ शाखा वेंगुर्ला तर्फे तेली समाजातील दहावी, बारावी, पदविका, शिष्यवृत्ती, तसेच विशेष परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवार दि. ६ ऑगस्ट रोजी दाभोली येथील अरुण डिचोलकर यांच्या निवासस्थानी सायं.४ वा. आयोजित करण्यात आला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना दहावीत ७५ टक्के व बारावीत ७० टक्के पेक्षा जास्त गुण आहेत अशांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत ३१ जुलैपर्यंत क्वॉलिटी कोल्ड्रिक्स, दाभोली नाका येथे किवा नम्रता बिपिन वरसकर यांच्याकडे आणून द्यावीत. या कार्यक्रमाला तेली समाजातील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी तसेच समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका सचिव विद्याधर वरसकर यांनी केले आहे.
