⚡वेंगुर्ला ता.१८-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे मार्फत सन २०२३ मध्ये घेतलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत वेंगुर्ला येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या इयत्ता आठवीतील अथर्व नित्यानंद मांजरेकर याने ७५.८३ टक्के गुण मिळवीत शहरी सर्वसाधारण गटातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आठवा व वेंगुर्ला तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे.
कु. अथर्व याला मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, सहशिक्षक पांडुरंग मिशाळ, अनिकेत वेंगुर्लेकर, धनश्री तुळसकर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, चेअरमन डॉ.मंजिरी मोरे-देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलत देसाई, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, सुरेंद्र चव्हाण, मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो – अथर्व मांजरेकर
