राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुतळ्याला जोडे मारून निषेध…

सावंतवाडी ता.१८-: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ वायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचा सावंतवाडी जोडो मारून निषेध करण्यात आला. आतापर्यंत अनेक जणांची सीबीआय ,ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यामुळे त्यांचे चरित्र जगासमोर आले आहे.

भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे.

गांधी चौकात झालेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष आसिफ शेख, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष नजीर शेख, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, तालुका उपाध्यक्ष राकेश नेवगी, तालुका उपाध्यक्ष समीर सातार्डेकर, जिल्हा सरचिटणीस उद्योग व्यापार नियाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक इफ्तिकार राजगुरू, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, जिल्हा युवती अध्यक्ष सौ सावली पाटकर, जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया, प्रा. सचिन पाटकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गावडे, अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्ष एडवोकेट राबिया शेख आगा, महिला अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मारिता फर्नांडिस, सौ पूजा दळवी, प्रांजल कदम, संगीता मिस्त्री, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page