उपसरपंच अमित परब:सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली मागणी
⚡सावंतवाडी ता.१८-: येथील चराठा कार्यक्षेत्रामध्ये जि. प .शाळा नंबर १ येथे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.सदरची शाळा ही रस्त्यालगत असल्याने शाळेतील मुलं ये जा करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तसेच यापूर्वी येथील भागात अपघात झालेले आहेत, सदर रस्त्यावरून वाहने मोठ्या प्रमाणात जात असल्याने चराठा जि .प .शाळा नंबर १ रस्त्यावर गतिरोधक घालण्यात यावा अशी मागणी चराठा ग्रामपंचायत उपसरपंच अमित परब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनद्वारे केली आहे.
