⚡कणकवली ता.१८-:
कणकवली तालुक्यातील सांगवे कनेडी ग्रामपंचायत येथे कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग यांच्यावतीने वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्रचे श्री.काजरेकर यांनी केले.माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी माजी खास.ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी संदेश सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना कृषी विज्ञान केंद्र यांनी असेच विविध उपक्रम सांगवे ग्रामपंचायतमध्ये राबवावेत आमचे पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर ब्रिगे.सुधीर सावंत यांनी वृक्ष लागवडीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी काजू , जांबुळ,चंदन, साग,गवती चहा,बेल अशी विविध प्रकारचे सुमारे 450 रोपे वाटण्यात आली.अश्याच प्रकारे भिरवंडे व दिगवळे ग्रामपंचायतमध्ये रोपे वाटण्यात आली.यावेळी सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले.
सांगवे ग्रामपंचायत सरपंच संजय सावंत, उपसरपंच प्रफुल्ल काणेकर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत,उपतालुकाप्रमुख सुनील सावंत,माजी सभापती सुरेश सावंत,सोसायटी चेअरमन श्री.सावंत,रॉबर्ट डिसोझा,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
