नट वाचनालयाच्यावतीने २८ रोजी कविता वाचन कार्यक्रम

बांदा
बांदा गावचे सांस्कृतिक वारसा लाभलेले नट वाचनालय, वाचक व रसिकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम राबविते, याचाच एक भाग म्हणून शुक्रवार दिनांक २८ जुलै २०२३ रोजी दूपारी ठिक ४.०० वाजता पावसाळी कविता वाचन कार्यक्रम आयोजित केला आहे.

या ‘पावसाळी कविता वाचन’ कार्यक्रमास काव्यप्रेमी रसिकांना आवाहन करण्यात येते की या कार्यक्रमात सहभागी होउन आपली स्वरचित कविता वाचून किंवा गाऊन दाखवावी व हा कार्यक्रम यशस्वी करावा. भाग घेणा-या काव्यप्रेमींनी आपली नावे ग्रंथपाल नट वाचनालय, बांदा यांजकडे दिनांक २६ जुलै २०२३ पुर्वी दयावीत असे आवाहन अध्यक्ष व सेक्रेटरी नट वाचनालय बांदा यांनी केले आहे.

You cannot copy content of this page