“ग्लोबल महाराष्ट्र” च्या बातमीची दखल;वाहनचालकांनी मानले आभार
⚡दोडामार्ग,ता.१७-: दोडामार्ग आयी मार्गावरील बाजारपेठेतील तो धोकादायक खड्डा अखेर बांधकाम विभागाने बुजवला. सद्यस्थितीत तो जांभा दगडाने बुजवला आहे; पाऊस थांबल्यावर तो पावसाळी डांबराने बुजवण्याची मागणी होत् आहे.
त्या रस्त्याचे पहिल्या टप्प्यातील डांबरीकरण झाल्यावर लगेचच तो खड्डा पडला होता; पण हमी कालावधी व काम अपूर्ण असूनही त्याकडे ना ठेकेदाराने लक्ष दिले ना बांधकामच्या पर्यवेक्षकाने.त्यामुळे पावसाचे पाणी साचले की तो खड्डा लक्षात येत नव्हता. त्यामुळे वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत होते.शिवाय अनेकजण खड्डा चुकवण्यासाठी वाहने खड्ड्याच्या उजव्या म्हणजेच चुकीच्या बाजूने हाकायचे त्यामुळे जीवघेणा अपघात घडण्याची भीती होती.त्याकडे “ग्लोबल महाराष्ट्र” ने लक्ष वेधले.त्यानंतर तो खड्डा तत्काळ बुजविण्यात आला.त्याबद्दल वाहनचालकांनी बांधकाम विभागाचे आणि “ग्लोबल महाराष्ट्र” चे आभार मानले.
