⚡सावंतवाडी ता.१७-: सेंट्रल इंग्लिश स्कूलची विदयार्थीनी कु . खुशी संतोष गवस ही पूर्व माध्यमिक शिष्यवृती
परीक्षा २० २२ मध्ये शहरी विभागात ६८. ४५टक्के गुण मिळवून जिल्ह्यात २३ वी व तालुक्यात ६ वी येत शिष्यवृतीसाठी पात्र ठरली आहे . तिला शिक्षिका श्रीम. सिद्धी गोसावी यांनी गणित विषयासाठी विशेष मार्गदर्शन केले . तसेच श्रीम. मारिया पिंटो ,श्रीम. स्मृती गवस,श्रीम. फिरदोस ख्वाजा या शिक्षकांचेही मार्गदर्शन लाभले .
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी कु . खुशी गवस हीचे अभिनंदन केले व भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
