पत्रकार निलेश मोरजकर यांचा नट वाचनालयाच्यावतीने सत्कार

पुरस्कार मिळाल्याने उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्याहस्ते केला सन्मान

बांदा/प्रतिनिधी
येथील ‘सकाळ’चे बातमीदार तथा नट वाचनालयाचे संचालक निलेश मोरजकर यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचा राष्ट्रीय पातळीवरचा ‘द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड’ प्राप्त झाल्याने नट वाचनालयाच्या वतीने उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.


श्री मोरजकर हे गेली २१ वर्षे पत्रकारितेत कार्यरत असून त्यांना गोवा येथे माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते भास्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडी यांचा जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देखील जाहीर झाला आहे.
श्री मोर्ये यांनी यावेळी श्री मोरजकर यांच्या कार्याचा गौरव करत आपण बांदा शहराच्या विकासासाठी पत्रकारितेतून योगदान दिले असून नट वाचनालयच्या माध्यमातून वाचन चळवळ अधिक सक्रिय करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
यावेळी कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर, सुधीर साटेलकर, स्वप्नीता सावंत, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, अमिता परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page