शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिनानिमित्त दोडामार्गात अनेक कार्यक्रम

⚡दोडामार्ग.ता.१७-: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस उद्या (ता.18) होत आहे .त्यानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन दीपक केसरकर मित्रमंडळ आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


दोडामार्ग शिवसेना कार्यालयात उद्या सकाळी दहा वाजता वाढदिवस तारीख करण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी ११ वाजता साटेली भेडशी येथील करुणा सदन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये समूहगीत,वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे बक्षिस वितरण होईल.यावेळी
विद्यार्थांच्या उपस्थितीत वाढदिवस तारीख करण्यात येईल.
त्यानंतर बुधवारी (ता.19) शिवसेना कार्याललयात १० वी १२ वी विषेश प्राविण्य विद्यार्थांच्या गुणगौरव कार्यक्रम होईल.
त्यानंतर गुरुवारी (ता.20) येथील ग्रामीण रुग्णालयात मेगा ऑर्थोपेडिक कॅम्प आहे.त्यात विविध तपासण्या मोफत केल्या जातील.
त्यानंतर शुक्रवारी (ता.21) साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मेगा ऑर्थोपेडिक कॅम्प मोफत तपासणी शिबिर होणार आहे.दोन्ही शिबिरे पुणे येथील लोकमान्य हॉस्पीटलच्या सौजन्याने होणार आहेत.
तसेच रविवारी (ता. २३) सकाळी नऊ वाजता
बोर्डिंग ग्राऊंड जवळील गांधी मिशन स्कूल येथून
वर्षा मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. स्पर्धा तालुका मर्यादित आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शिक्षणमंत्री दीपक केसरकर करणार आहेत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत आणि तालुकावासीयांनी शिबिरासाठी उपस्थित राहावे व्हावे असे आवाहन तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केले आहे.

You cannot copy content of this page