केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतले बांदेश्वराचे दर्शन..

बांदा ता.१७-:श्री देव बांदेश्वर हे जागृत व भक्तांच्या हाकेला धावून येणारे देवस्थान आहे. मला याची प्रचिती वेळोवेळी आली आहे, त्यामुळे येथे नतमस्तक होण्यासाठी आलो आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. येथील श्री देव बांदेश्वर मंदिराला आज त्यांनी सकाळी भेट देऊन बांदेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्या हस्ते श्रीफळ व कृपाप्रसाद देऊन मंत्री नाईक यांचा सन्मान करण्यात आला.


यावेळी माजी सभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत, बाळु मोर्ये, अशोक परब यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. केंद्रीयमंत्री नाईक म्हणाले की, श्री देव बांदेश्वरची महती अगाध असून आपण त्याचे निस्सीम भक्त आहोत. आपण वेळोवेळी ज्यावेळी संधी मिळेल त्या त्या वेळी याठिकाणी येऊन श्री बांदेश्वरचे दर्शन घेतो.

You cannot copy content of this page