सेवानिवृत्त शिक्षकांनी सामाजिक भान ठेवून नियुक्त्या स्विकारु नयेत:वामन तर्फे

⚡कणकवली ता.१७-: सेवानिवृत्त बांधवांनी सामाजिक भान राखावे. केवळ २०००० रूपये मिळणार म्हणून नियुक्ती स्विकारु नये. विद्यार्थी हीत जोपासावे वाटत असेल तर मोफत सेवा द्यावी. ज्या माध्यमिक-प्राथमिक शिक्षकांनी अर्ज केले आहेत त्यांनी बेकार तरुणांचा विचार करावा . असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिव गुरूदास कुसगांवकर यांनी केले आहे.

राज्यात डी. एड, बी एड बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत असताना कोणत्याही प्रकारची शिक्षक भरती न करता पळवाट म्हणून दि. ७/७/२३ च्या शासन आदेशानुसार सेवानिवृत्त शिक्षकांना २०००० रूपये मानधनावर सेवेत घेण्याचे ठरविले आहे. शिक्षकांच्या वेतनावर जास्त खर्च होत आहे असे वारंवार सांगणाऱ्या शासनाच्या लोकांना शिक्षणसेवक मानधन १६००० रूपये असताना २०००० रूपये मानधनावर सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करून काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे व सचिव श्री. कुसगांवकर यांनी विचारला आहे.

You cannot copy content of this page