आंबोली घाटात दरडीच्या ठिकाणी चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रक कोसळून चालक ठार…

⚡आंबोली ता.१२-: मुख्य दरडीच्या ठिकाणी चिरे वाहतुक करणारा ट्रक दिड हजार फूट खोल दरीत कोसळून चालक शंकर मनोहर पाटील वय २८ रा. नंदगड जि. बेळगांव याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना रवीवारी पहाटे घडली .

या बाबतची माहीती सदया घाटात दरडीसाठी जाळी लावत असणाऱ्या कामगारांनी रवीवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलीसांना दिली.

यावेळी घाटात ऊतरण्यासाठी बाबल अल्मे अल्मेडा टीमचे ,दीपक मेस्त्री,दीपक नाटलेकर,ओंकार कळसुलकर,प्रथमेश गावडे, सागर ढोकरे,वामन पालेकर तसेच सांगेली येथील बाबल आलमेडा टीम यांनी मदतकार्यात सहभागी होऊन मृतदेह बाहेर काढला.

You cannot copy content of this page