आयोजक विशाल परब यांनी दिल्ली येथे भेट घेत दिले निमंत्रण
सावंतवाडी ता.१२-: विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी आज भाजप पदाधिकाऱ्यांसोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दिल्ली येथे भेट घेत कुडाळ येथे निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शिवगर्जना नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त त्यांनी राणे यांची भेट घेत निमंत्रण दिले आहे.
दरम्यान या भव्य वाढदिवसा समारंभाला आपण उपस्थित राहणार असल्याचे राणे यांनी आश्वासन दिले.
विशाल सेवा फाउंडेशन च्या वतीने 17 मार्च रोजी कुडाळ येथे एसटी स्टँड नजदीक मुंबई गोवा हायवेच्या बाजूला भव्य शिवगर्जना या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले हा नाट्यप्रयोग प्रथमच होत असून यात 700 हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत.
यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोरे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक सावंत, बंटी पुरोहित, आदी उपस्थित होते.
