⚡मालवण ता.१३-: मालवण येथील मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयात दोन दिवसांपूर्वीच मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी म्हणून रुजू झालेले एस. एस. अलगिरी यांची सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शुक्रवारी आपला पदभार स्वीकारला.
रत्नागिरीतील मत्स्य विकास अधिकारी रत्नाकर राजम हे सध्या मालवण येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. आता अलगिरी यांची सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने सिंधुदुर्गला पूर्णवळ एक प्रमुख अधिकारी उपलब्ध झाला आहे. अलगिरी यांचे राजम, कार्यालय अधीक्षक अरुण दहिफळे, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, देवगड परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर, मुरारी भालेकर, शिवाजी वाघमारे यांनी स्वागत केले.
