हडी येथे युवतीसेनेतर्फे महिलांचा सन्मान

⚡मालवण ता.१२-:
महिला दिनानिमित्त हडी येथील मैत्री ग्राम महिला संघातर्फे हडी शाळा नं. २ येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवतीसेना विस्तारक रुची राऊत यांच्या संकल्पनेतून युवतीसेना तालुकाप्रमुख सौ. निनाक्षी शिंदे – मेतर व मसुरे विभाग महिला प्रमुख सौ. आर्या गांवकर यांच्या तर्फे गावातील ज्येष्ठ व कर्तबगार महिलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी हडी गावातील विविध बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव यांचा सत्कार करण्यात आले. तसेच दिल्ली येथे समूहनृत्यात सहभागी झालेल्या गावच्या सुकन्या साक्षी लाड, हर्षाली लाड यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी हडीचे सरपंच प्रकाश तोंडवळकर, उपसरपंच भरत लाड, दिनेश सुर्वे, उमेश हडकर, जान्हवी पांजरी, सायली मसुरकर, पूजा हडकर, संपदा परब, सोनाली कदम, प्रज्ञा कदम आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page