⚡मालवण ता.१२-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील महान ग्रामपंचायत येथे महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे :- संगीत खुर्ची: प्रथम कविता शिंदे, द्वितीय- समिक्षा हळवे, तृतीय- प्रियांका गावडे. स्मरणशक्ती स्पर्धा : प्रथम- ऋता चव्हाण, द्वितीय- सुकन्या परब, तृतीय- शिल्पा सावंत मेणबत्ती पेटविणे स्पर्धा प्रथम प्रतिज्ञा हळवे, द्वितीय- समिक्षा हळवे, तृतीय- सई शिंदे सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
आजची महिला सबल झाली पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात महिलेने पुढे आले पाहिजे. महिला सक्षमीकरणासाठी महान ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सरपंच अक्षय तावडे यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच अजित राणे, ग्रामसेवक सागर देसाई, स्वाती घाडी, श्रद्धा हळवे तसेच महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. ग्रामसेवक सागर देसाई यांनी आभार मानले.
