⚡कणकवली ता.१०-: जागतिक महिला दिनानिमित्त नांदगाव ग्रामपंचायत पुरस्कृत महीलांसाठी खास आकर्षण “खेळ पैठणीचा होम मिनिस्टर” कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या समोरील पटांगणात आयोजित करण्यात आला होता.यासाठी गावातील महीलांनी या खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रममध्ये भाग घेतला होता.
यामध्ये अनुक्रमे तीन विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पैठणी साडी तर सर्व सहभागी महीलांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले आहे.
खेळ पैठणीचा होम मिनिस्टर मध्ये प्रथम वैदेही विजय पाटील, व्दितीय अस्मिता शामसुंदर मोरये ,तृतीय स्नेहल संजय परब या महीलांनी सुयश संपादन केले आहे.
खेळ पैठणीचा कार्यक्रम सुत्रसंचालन पत्रकार ऊमेश परब यांनी केले.या महीला दिनाचे औचित्य साधून नांदगाव ग्रामपंचायतच्यावतीने महीलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
तसेच नांदगाव येथील महीला माजी सरपंच बापार्डेकर, हर्षदा वाळके, आफ्रोजा नावलेकर यांचा ही शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे,ग्रामपंचायत सदस्या अक्षता खोत, गौरी परब,पूजा सावंत,नमिता मोरये, जैबा नावलेकर,रमिजान बटवाले , पत्रकार ऋषिकेश मोरजकर आदी उपस्थित होते.
नांदगाव ग्रा.पं.च्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
