महिला दिनानिमीत्त क्राॅसकंट्री रनमध्ये रसिका,सेहा,रिया,प्राची यांचे यश

⚡कणकवली ता.१०-: सिंधुदुर्गात जिल्ह्यात कणकवली तालुक्यात प्रथमच श्री.फोंडकण देवी स्पोर्टस् ॲकॅडमी निरोम व सिंधुदुर्ग जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स् असोसिएशन,सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने आयोजित जागतीक महिला दिना निमीत्त पहिली जिल्हास्तरीय महिला क्राॅस कंट्रीरन स्पर्धा कलमठ ,कणकवली जि.सिंधुदुर्ग येथे आयोजन करण्यात आले होते.


या स्पर्धेचे उदघाटन कलमठ ग्रामपंचायतचे सदस्य पप्पू यादव ,कलमठ बिडयेवाडीतील श्री.परब ,समीर जयवत राऊत (सह.सचिव),कु.अंजली जयसिंग गायकवाड (जिल्हा महिला ॲथलेटिक्स् प्रशिक्षक), सिध्दांत चोंडे ,संदिप चोंडे ,विजयी भव ॲकॅडमी,देवगडचे प्रशिक्षक प्रशांत शिरगावकर, तेज स्पोर्टस् कलबचे प्रशिक्षक कु.तेजस्वीनी नाईक यांच्या हस्ते ध्वज दाखऊन रेस सोडण्यात आली व पारितोषीक समारंभ झाला.विजयी स्पर्धकांचा निकाल खालील प्रमाणे १४ वर्षाखालील मुली:- प्रथम क्रमांक -कु.सेहा संतोष तेरसे (तेज स्पोर्टस् कलब,निरुखे ),द्वितीय क्रमांक – कु.सानिका पुंडलीक पावशे (जामसंडे हायस्कुल,देवगड)१८ वर्षाखालील मुली:-प्रथम क्रमाक – कु.रिया रविंद्र गावकर (कणकवली कॉलेज,कणकवली), द्वितीय क्रमांक – कु.प्राची दिनेश लाड (श्री फोंडकण देवी स्पोर्टस् ॲकॅडमी,निरोम) ,१८ वर्षावरील खुला गट :- प्रथम क्रमांक -कु.रसिका बाळकृष्ण परब ( (श्री फोंडकण देवी स्पोर्टस् ॲकॅडमी,निरोम),द्वितीय क्रमांक – कु.सानिका संजय तांबे (विजयी भव ॲकॅडमी,देवगड),तृतिय क्रमांक -कु.सोनम श्रीकृष्णा घाडी (विजयी भव ॲकॅडमी, देवगड),चौथा क्रमांक – श्रृती भालचंद्र सकपाळ (विजयी भव ॲकॅडमी,देवगड) तसेच विजयी झलेल्या खेळाडूंचे अभिनंदन कले.

You cannot copy content of this page