⚡मालवण ता.०९-: भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण भाजप युवा मोर्चा वतीने डे नाईट बीच हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन १५ मार्च रोजी चिवला बीच मालवण येथे करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप युवा मोर्चा मालवण शहर उपाध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी दिली आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघास ११ हजार १११ तर उपविजेत्या संघास ५ हजार ५५५ व अन्य पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेबाबत अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी अमू हर्डीकर ९४२३८०६१८४, जोंटी फर्नांडिस ९८०४९२१७१७, अक्षय मोर्जे ९७६७२३२३९७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, चेतक पराडकर, विशाल गोवेकर, फ्रान्सिस फर्नांडिस, महेश कांबळी यांनी केले आहे.
