व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा

बांदा/प्रतिनिधी
श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रशालेच्या विद्यार्थिनी कृपा वारंग, श्रेया हळदणकर यांनी महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले, जिजामाता, मदर तेरेसा, ऍनी बेझंट, आनंदीबाई जोशी, लता मंगेशकर, प्रतिभाताई पाटील, सानिया मिर्झा यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या वेशभूषा केल्या व त्यांच्या विषयी माहिती सादर केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिशा रॉड्रिक्स यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी प्रशाळेतील शिक्षिका व शिक्षकेतर महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
फोटो :-
बांदा नाबर प्रशालेत महिला दीन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शिक्षिका व विद्यार्थिनी. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page