आम. रविंद्र फाटक 11 रोजी सिंधुदुर्गात

शिवसैनिकांचा कणकवलीत मेळावा; सत्कार समारंभाचे आयोजन

कणकवली 9 मार्च (प्रतिनिधी)- शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.यानिमित्त कणकवली मातोश्री हॉल कणकवली येथे शनिवार 11 मार्च 2023 दुपारी 3 वाजता आम.रविंद्र फाटक यांचे
भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांची मुख्य उपस्थिती असणार आहे.
शनिवार 11 मार्च 2023 दुपारी 3 वाजता मातोश्री मंगल कार्यालय कार्यकर्ता व शिवसैनिकांचा मेळावा, सरपंच ,उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार, पक्षप्रवेश मेळाव्यात होणार आहे.
तरी् शिवसैनिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page