Headlines

महिला दिनी एनसीसी विद्यार्थ्यांची सिंधुदुर्ग किल्ला ते भरतगड किल्ला मशाल घेऊन ट्रेकिंग

⚡मालवण ता.०९-: मालवण येथील स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी )विभागामार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यापासून भरतगड किल्ल्यापर्यंत ट्रेकिंग रॅली काढत महिला सक्षमीकरण मशाल पेटवून १८ किलोमीटर अंतर मशाली घेऊन चालत पूर्ण करण्यात आले.

महिला दिनी सकाळी मालवण बंदर जेटी येथे प्रा. ज्योती तोरस्कर, योगा ग्रुप सदस्य अनुष्का चव्हाण यांच्या हस्ते मशाली प्रज्वलित करून प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ट्रेकिंग कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य ठाकूर व कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी गणेश कूशे, योगा ग्रुप सदस्य व सुरत मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

जेटीवरून सिंधुदुर्ग कॉलेजच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर कॉलेजच्या सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी ट्रेकिंग रॅलीचे स्वागत केले. ही रॅली कांदळगाव मध्ये आल्यानंतर श्री रामेश्वर मंदिराचे पुजारी विठू गुरव व त्यांचे वडील यांनी मशाल ट्रेकिंग कॅम्पचे स्वागत केले. सिंधुदुर्ग किल्ला ते भरतगड किल्ला असे १८ किलोमीटर अंतर चालून पूर्ण केल्यानंतर मर्ढे येथे सरपंच संदीप हडकर, ग्रामसेवक शंकर कोळसुलकर, मंडळ अधिकारी एस. आर. चव्हाण, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर या सर्वांनी या ट्रेकिंग कॅम्प व मशालींचे स्वागत केले. यावेळी एनसीसी विभागाचा व एनसीसी विद्यार्थ्यांचा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरव करण्यात आला. त्यानंतर ही रॅली मशाली घेऊन भरत गडावर पोहचली. एनसीसी विद्यार्थ्यांनी १८ किमी अंतर पायी चालत मशाली घेऊन मशाली सक्षमीकरणाच्या घोषणा देत पूर्ण केले.

या कार्यक्रमाचे आयोजन एनसीसी विभाग प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा.डॉ. एम. आर खोत, एनसीसी सीनियर नारायण मुंबरकर ,प्रीती बांदल, तेजस पोळ ,मिथिल मोरवेकर,तृप्ती माडिये, सिद्धी कुमठेकर ,अर्जुन मालवणकर, बिरू खरात यांनी केले. या ट्रेकिंग मध्ये पन्नास एनसीसी कॅडेट्स सहभागी होते.

यावेळी लेफ्टनंट प्रा डॉ.खोत यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मिलिटरी, तटरक्षक दल पोलीस भरती ,एअर फोर्स ,नेव्ही रिलायन्स उद्योग, महाराष्ट्र कॅडेट फोर्स, पेरॅमिलीटरी व वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यामध्ये एनसीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती बाबत माहिती दिली. या कॅम्प मध्ये कॉलेजचा जीएस ओंकार यादव व सुरज शिवगण आदी सहभागी होते.

You cannot copy content of this page