⚡कणकवली ता.०८-: मालवण तालुक्यातील किर्लोस गावठाणवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक मंडळातर्फे
शिवजयंती उत्सव 10 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे.
आहे यानिमित्त 9 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता शालेय विद्यार्थी इयत्ता पहिली ते नववी पर्यंत वकृत्व व निबंध स्पर्धा दुपारी 2 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक किर्लोस येथून पालखी व शिवज्योत आणण्यासाठी सर्व मंडळी मालवण किल्ला येथे रवाना रात्रौ 11 वाजता आचरा गावी विश्रांती.
10 मार्च रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पालखी व शिवज्योत मिरवणुकीसह आगमन 11वाजता शिवपूजन पालखी पूजन शिवज्योत पूजन व महाआरती,11.30वाजता मान्यवरांचे स्वागत व समारंभ दुपारी 1 वाजता वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण दुपारी 3 ते 6 वाडीतील महिलांची फुगडी, संगीत खुर्ची व विविध खेळ सायंकाळी 7 वाजता लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स व रात्री 9 वाजता अमृतनाथ नाट्य मंडळ वेंगुर्ला संचालक श्री अनंत गोसावी यांचे नवीन दर्जेदार नाट्यपुष्प मोरया गोसावी हा नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्व नाट्य रसिक व ग्रामस्थ यांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
