⚡कणकवली ता.०८-:
जागतिक महिला दिन जिल्हा परिषद शाळा तळेरे नं. 1 मध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त पहिल्या महिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र प्रतिमेस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा करंदीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव यांच्या हस्ते सर्व महिला शिक्षिका, अंगणवाडी सेविका व शिक्षकेत्तर महिला कर्मचारी यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
जि.प. शाळा तळेरे नं. 1 मध्ये जागतिक महिला दिन साजरा
