मालवण दि प्रतिनिधी
वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग व नाथ गोसावी युवक मंडळ, चिंदर यांच्या संयुक्त विद्यमाने लाठीकाठी प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
९० विद्यार्थ्यांचा सहभाग
प्रशिक्षणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायंगणी नं. १, वायंगणी हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडी नं. १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडी नं. २, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडवळी वरची शाळेतील ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नाथ गोसावी युवक मंडळ, चिंदर सडेवाडीचे अध्यक्ष योगेश गोसावी, सचिव मंगेश गोसावी, उपाध्यक्ष पांडुरंग गोसावी, खजिनदार हेमंत गोसावी, प्रमोद गोसावी, संतोष गोसावी, मोरेश्वर गोसावी, स्वप्नील गोसावी, मार्गदर्शक किशोर सरनोबत तसेच प्रशालेचे शिक्षक उपस्थित होते.
