सर्जेकोट बंदरावर रंगली आपत्ती व्यवस्थापनची रंगीत तालीम

मालवण दि प्रतिनिधी

सर्जेकोट जेटी येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. या रंगीत तालमीमध्ये मालवण पोलीस ठाण्याचे पाच कर्मचारी, होमगार्ड, वॉर्डन असे कर्मचारी सहभागी झाले होते.

सर्जेकोट जेटी समुद्रामध्ये बोटीवरील खलाशी पाण्यात बुडत असल्याची माहिती फोनद्वारे मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी समुद्राच्या पाण्यात ‘बुडत’ असलेल्या खलाशाला वाचविले.

You cannot copy content of this page