महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी परिवर्तन घडविणारी प्रशिक्षणे जनशिक्षण संस्थेने घ्यावी

मानव संसाधन विकास संस्था अध्यक्षा उमा प्रभू यांचे आवाहन

ओरोस ता.०८-: ग्रामीण भागातील महिलांना येथील स्वयंरोजगाराचे उत्तम प्रकारे प्रशिक्षण देऊन आत्मविश्वासाने मानसिकतेचे स्वातंत्र्य निर्माण करून देण्यासाठी, एक आत्मनिर्भर विश्वास निर्माण करून देण्यासाठी जनशिक्षण क्षमता वृद्धी कार्यक्रमातून परिवर्तन प्रशिक्षनातून परिवर्तन झाले पाहिजे या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत असे प्रतिपादन मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू यांनी केले.


ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे जनशिक्षण संस्थेच्या कार्यालयात क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू यांच्या हस्ते जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग चे अध्यक्ष डॉक्टर शरद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले .यावेळी प्रमुख पाहुणे लुपिन फाउंडेशन व व्यवस्थापकीय कमिटी सदस्य योगेश प्रभू, सौ यशस्वी सावंत ,संचालक सुधीर पालव आदींसह प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत मेस्त्री यांनी केले तर प्रास्ताविक सुधीर पालव यांनी केले. यावेळी क्षमता विकास कार्यक्रमाच्या आणि त्यांना शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमा मार्फत पालव यांनी माहिती दिली. ग्रामीण भागातील महिलाना आर्थिक उन्नत करण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी जनशिक्षण संस्थाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटक मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ उमा प्रभू म्हणाल्या मानव विकास संस्था संचलित जनशिक्षण संस्थेच्या वतीने महिलांना विविध प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविण्याचा हा कार्यक्रम असून संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहेत. मानव संसाधन विकास संस्थेच्या आणि शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी गावागावात परिवर्तन झालं केले आहे त्या परिवर्तनातून सुजलाम सुफलाम ग्रामीण भाग आणि जिल्हा व्हावा यासाठी महिला सबलीकरण सशक्तिकरण यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधले जाते महिला दिन साजरा केला जातो स्त्री ही बायको, आई ,बहीण, मुलगी या नात्याने विविध रूपाने संबोधली जाते तिच्यामध्ये असलेला न्यूनगंड न ठेवता एक आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे आत्मविश्वासाचे स्वातंत्र मिळाले पाहिजे या हेतूने प्रशिक्षण देणाऱ्या महिलांचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. सिंधुदुर्ग नगरी येथे भव्य दिव्य इमारतीत एक व्यासपीठ निर्माण केले आहे याचा जिल्ह्यातील महिला भगिनींना आर्थिक आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे त्याचा फायदा घ्यावा असे आवाहनही सौ उमा प्रभू यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद सावंत म्हणाले आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठ कशी निर्माण करावी याबाबत जनशिक्षण मार्फत केंद्र शासनाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत फूड प्रोसेसिंग सारख्या तंत्रज्ञानातून अकरा प्रशिक्षण ग्रुप उभे केले आहेत २५ टक्के लोक स्वतःच्या पायावर आज रोजगार करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० पुरुषामागे १०७ महिला हे प्रमाण असून देशात आणि राज्यातही त्याचप्रमाणे प्रमाण आहे मानव विकास संस्थेच्या माध्यमातून मानव आणि साधन त्याचा आदर्श घालून द्यायला हवा परिवर्तन जागृत करण्याचे काम सुरू आहे, आर्थिक रोजगार निर्मितीवर भर दिला असून जिल्ह्यात राज्यात परिवर्तन केंद्र सुरू केली आहेत काही प्रमाणात होणार आहेत त्यातून गावातील जिल्ह्यातील परिवर्तन झाले पाहिजे पांग्रड सारख्या काही गावात नाबार्डच्या माध्यमातून हट उभे केले जात आहे त प्रशिक्षकांनी याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे व ग्रामीण महिला सबलीकरण आत्मनिर्भर बनवा यासाठी परिवर्तन केंद्र केंद्रित ठेवून परिवर्तन केंद्राभिमुख काम करा असे आव्हान त्यांनी केले .
यावेळी लुपिन फाउंडेशन चे योगेश प्रभू म्हणाले आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक तंत्रज्ञान विकसित होत आहे येथील कच्च्या मालावर विविध प्रोसेसिंग युनिट या दृष्टीने महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिक रोजगार उभा करण्यासाठी जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून परिवर्तन केंद्राच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून क्षमता वृद्धी कार्यक्रम राबविला जात आहे आपण प्रशिक्षकांच्या माध्यमातून गावागावात असे प्रशिक्षण कार्यक्रम रोजगार विषयक उपक्रम राबवून परिवर्तन केंद्र लोकाभिमुख बनवा व या परिवर्तनाच्या माध्यमातून गावाचे परिवर्तन घडवून आणा असे आवाहनही त्यांनी केले .शेवटी उपस्थित आमचे आभार रमेश खरात यांनी मानले [सोबतफोटो ]

You cannot copy content of this page