डिंगणेचे माजी सरपंचांकडून अपघातग्रस्त विद्यार्थ्याला केली पाच हजारची आर्थिक मदत…

बांदा/प्रतिनिधी
येथे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रोणापाल येथील सुरज गोठस्कर या विद्यार्थ्याला डिंगणेचे माजी सरपंच तथा मडुरा माध्यमिक विद्यालयाचे लिपिक नाना सावंत यांनी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी या विद्यार्थ्यांचे आई वडील तसेच प्रकाश गावडे व नागेश सावंत उपस्थित होते.
या विद्यार्थ्याला राजीव गांधी बिद्यार्थी योजनेतून अपघाताचे पैसे मिळवून देणार असल्याचे आश्वासन श्री सावंत यांनी यावेळी कुटुंबियांना दिले. बांद्यात ८ दिवसांपूर्वी अपघात होऊन सूरजच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याची आर्थिक स्थिती बेताची असल्याने समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी त्याला मदतीचा हात दिला आहे. श्री सावंत यांनी देखील आर्थिक मदत देत भविष्यात शासकीय योजनेतून मदत मिळवून देण्याची ग्वाही यावेळी दिली.

You cannot copy content of this page