डेरवण येथील टेबलटेनिस स्पर्धेत मालवणच्या खेळाडूंचे सुयश

⚡मालवण ता.०४-: श्री.विठ्ठलराव चॅरीटीज ट्रस्ट डेरवण तर्फे डेरवण येथे आयोजित टेबल टेनिस स्पर्धेत मालवण टेबल टेनिस अकॅडमीच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळविले. या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात मालवण येथील आर्या दिघे हिने सुवर्णपदक तर प्राची चव्हाण हिने ने रजत पदक पटकाविले. तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटात दुर्वा चिपकर हिने कांस्य तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात गणेश चव्हाण याने कांस्य पदक मिळविले.

या स्पर्धेत आर्या दिघे हिने १३ आणि १७ वर्षांखालील गटातही रजत पदकावर मोहोर उमटवली. याशिवाय प्रज्वल नामनाईक, सई कांबळी यांनी उपांत्य फेरीत तर वीरा वारंग, वर्षा परुळेकर,आधिष पेडणेकर, प्रत्युष शेट्टीगार, दीक्षांत शिवापूरकर, लौकिक तळवडेकर यांनी उपांत्य पूर्व फेरीमध्ये मजल मारली. हे सर्व खेळाडू मालवण रेवतळे येथील विष्णू कोरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण टेबल टेनिस अकॅडमी मध्ये सराव करतात.
सहभागी आणि यशस्वी स्पर्धकांचे मालवण वासियांकडून कौतुक करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page