⚡बांदा ता.०४-:
भारतीय सुराज्य संस्था शाखा सावंतवाडीच्या वतीने मडुरा माऊली मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने श्रमदानात सहभागी झाले होते. मडुरा देवस्थान समिती व ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
कन्नूर येथील श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज यांनी सन १९९३ मध्ये भारतीय सुराज्य संस्थेची स्थापना केली. अध्यात्म बरोबरच सामाजिक जीवनामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने ही संस्था संस्थापित करण्यात आली. सद्गुरू गणपतराव महाराज यांनी घालून दिलेल्या अष्टप्रतिज्ञे नुसार संस्थेचे कार्य चालते. मुख्य समिती व सल्लागार समितीच्या निर्देशानुसार प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी श्रमदान राबविण्यात येते. तसेच आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, मोफत औषधे यासारखे अनेक सामाजिक कार्यक्रम संस्था आयोजित करते. रोनापाल येथे विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी दोन स्वतंत्र वसतिगृह भारतीय सुराज्य संस्थेच्या प्रयत्नाने आणि एम फॉर सेवा या संस्थेच्या सौजन्याने उभारण्यात आली आहेत. तसेच मडूरा पंचक्रोशीतील होतकरू मुलांसाठी गणवेश वाटप व मडूरा हायस्कूल मधील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी बक्षीसे वितरण करण्यात येत असल्याची माहिती सत्संग प्रमुख गणेश नाईक यांनी यावेळी दिली.
भारतीय सुराज्य संस्थेतर्फे मडुरा माऊली मंदिर परिसरात श्रमदान
