⚡मालवण ता.०३-: अक्कलकोट स्वामी समर्थ जयंती उत्सवानिमित्त २३ मार्च रोजी तारकर्ली येथील गणपत तारी यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी १० ते १ वा. स्वामी समर्थांच्या कथांचे वाचन व प्रवचन, दुपारी १ वा. महाआरती, १.३० ते ४ पर्यंत महाप्रसाद व तिर्थप्रसाद, सायंकाळी ५ वा. भक्ती स्वरगंधा मालवणतर्फे भक्तीसंगीत कार्यक्रम, ७ ते ८.३० वा. अक्षय सातार्डेकर यांचे स्वामी समर्थ चरित्रावर कीर्तन, रात्री ९ वा, ब्राह्मण भजन मंडळ, पिरकोली यांचे भजन आदी कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन गणपत तारी यांनी केले आहे.
