⚡मालवण ता.०३-: ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, ग्लोबल रक्तविरांगना मालवण आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पहिली महिला मॅरेथॉन स्पर्धा जागतिक महिला दिन निमित्त
७ मार्च रोजी धूलीवंदन सुट्टीच्या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. फक्त महिलांसाठी असलेल्या या मिनी मॅरेथॉन स्पर्धेची ‘रन फॉर हेल्थ’ अशी संकल्पना असून ही स्पर्धा विनामूल्य असून तीन गटांमध्ये होणार आहे.
यामध्ये पहिला गट:-१६ ते ३० वयोगट (२ किमी ), दुसरा गट:-३१ ते ४५ वयोगट(२ किमी ), तिसरा गट:- ४६ ते ६० वयोगट (१ किमी चालणे- मिनी वॉक) अशी स्पर्धा होणार आहे. ७ मार्च रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी मालवण देऊळवाडा सागरी महमार्ग ते कोळंबपुल सागरी महामार्ग असे एकूण २ किलोमीटर अंतर आहे.
सहभागी होणाऱ्या स्पर्धकानी स्वतःच्या जबाबदारीवर स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. स्पर्धे दरम्यान मौल्यवान वस्तू परिधान करून येऊ नये. यामध्ये गट निहाय प्रथम, द्वितीय आणि तृतीय या विजेत्यांसह उत्तेजनार्थ महिलांना आकर्षक चषक, मेडल व सन्मानपत्र स्वरूपात पारितोषिक देण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व मेडल दिले जाईल. यासाठी नियम व अटी असून अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी राधा केरकर:- 9021163580, नेहा कोळंबकर:- 9404920366, समृध्दी धुरी:- 9420437657, अनुष्का चव्हाण:- 9404546337, वैशाली शंकरदास:- 9422392948, कोमल चव्हाण:- 86003 73178 यांच्याशी संपर्क साधावा. सर्व महिला ग्रुप, कॉलेज ग्रुप ,सामाजिक संस्था,महिला बचत गट, सर्व महिला खेळाडू, सर्व माजी शालेय महिला ग्रुप आदींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन ग्लोबल रक्तवीरांगना मालवण, ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग व कोकण महाराष्ट्र यांनी केले आहे.
