धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून मालवणात स्वच्छता मोहीम

⚡मालवण ता.०३-: डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात शासकीय ग्रामीण रुग्णालय मालवण येथील सर्व परिसरात स्वच्छता करण्यात आली. ओला आणि सुका कचरा मिळून सुमारे तीन टन कचरा काढण्यात आला.

या स्वच्छता अभियाना मध्ये श्री बैठक मेढा मालवण व श्री बैठक चिंदर येथील ३६५ सदस्य सहभागी झाले. तसेच या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने प्रदान केला त्या बद्दल त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे व प्रतिष्ठानची शिस्त, श्री सदस्यांची काम करण्याची पद्धत, तसेच नि:स्वार्थपणे काम करण्याची वृत्ती या वाखाणण्याजोगी होती. सकाळी ७.३० ते १० या वेळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सुदेश आचरेकर व ममता वराडकर यांची उपस्थिती होती. त्यांनी कचरा भरण्यासाठी ट्रक्टर उपलब्ध करून दिला. या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे सौ. देवायी, सौ. सावंत, सौ. हेरेकर, डॉ. पळसंबकर यांनीही उपस्थिती दर्शविली. सर्वांनी प्रतिष्ठानचे व श्री सदस्यांचे कौतुक केले.

You cannot copy content of this page