दीपक गोसावी यांचा ग्राम पंचायतने आदर्श शिक्षक पुरस्कार देवून केला सन्मान

धामापूर सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर यांनी केला गौरव

मालवण दि प्रतिनिधी

शिवजयंतीचे औचित्य साधून धामापूर बौद्धवाडी जि. प. प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक दीपक गोसावी यांना धामापूर ग्रामपंचायतीने २०२३ चा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सरपंच मानसी परब व उपसरपंच रमेश निवतकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ग्रामसेवक प्रणयकुमार पेडणेकर, सदस्य प्रशांत गावडे, स्वप्नील नाईक, साक्षी नाईक, श्रीमती पोफळे, श्रीमती थवी, तेजस्विनी भोसले, माजी सरपंच मानसी धामापूरकर, उद्योजक महेश धामापूरकर, महेश परब, माजी सरपंच परब, रवी कदम, दीपक जाधव आदी उपस्थित होते.

दीपक गोसावी यांनी २०१९ पासून धामापूर बौद्धवाडी शाळेला ग्रामस्थांच्या सहकार्याने शैक्षणिक उठाव करून नावालौकिक प्राप्त करून दिला आहे. शाळेमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात. याआधी गोसावी यांना राष्ट्रीय व राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. धामापूर गावचे उद्योजक व सरपंच यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार देण्यात आला. शाळेची या सर्वांनी पाहणी केली. या पुरस्कारबद्दल गोसावी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page