स्वरचित काव्य वाचन स्पर्धेत मधुरा माणगावकर प्रथम

मराठी भाषा दिनानिमित्त सानेगुरुजी वाचन मंदिराचे जिल्हास्तरीय आयोजन

मालवण दि प्रतिनिधी

येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित सानेगुरुजी वाचन मंदिरतर्फे मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय खुली स्वरचित काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मधुरा माणगावकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला द्वितीय क्रमांक आशिष पेडणेकर, तृतीय ” मेहक शेख, उत्तेजनार्थ प्रथम- अरविंद म्हापणकर, द्वितीय – आर्यन प्रभूगावकर, तृतीय क्रमांक तन्वी लाड यांनी प्राप्त केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रं व पारितोषिके देऊन, तर सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेची सुरुवात ‘खरा तो एकची धर्म’ या साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाली. आदर्श संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गीते सादर केली. यावेळी व्यासपीठावर सेवांगणचे कोषाध्यक्ष रुजारिओ पिंटो, नितीन वाळके, ज्योती तोरसकर, मेघना जोशी, सुभाष मयेकर उपस्थित होते.

स्पर्धेत तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ज्येष्ठ कवयित्री सुनंदा कांबळे आणि रुजारिओ पिंटो यांनी आपल्या कविता सादर केल्या. काव्य रसिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध लेखिका मेघना जोशी आणि मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सेवांगणचे सभासद सुरेश सामंत, सुभाष मयेकर, अप्पा परुळेकर उपस्थित होते. सुत्रसंचालन ऋतुजा केळकर यांनी केले. कार्यक्रमाची व्यवस्था संजयकुमार रोगे आणि सोनाली कांबळी यांनी पाहिली.

You cannot copy content of this page