अष्टपैलू कलानिकेतनतर्फे ४ रोजी नाट्यगीत गायन स्पर्धा व जीवन गौरव पुरस्कार वितरण

⚡मालवण ता.०२-: अष्टपैलू कलानिकेतन, मालवण या संस्थेतर्फे स्व. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा तसेच जीवन गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम दि. ४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मालवण भरड येथील दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. तर ५ मार्च रोजी नाट्यप्रवेश सादर होणार आहेत.

सदर स्पर्धा बालगट १० वर्षांपर्यंत, युवा गट ११ते १६वर्षांपर्यंत व १६ वर्षांवरील खुला गट अशा ३ गटांत घेतली जाणार आहे. यावेळी ज्येष्ठ नाट्य कलावंत विलास शिवराम गवंडी यांना जीवन गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी प्राचार्य मेजर श्रीपाद गिरसागर तर प्रमुख अतिथी म्ह्णून मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव उपस्थित राहणार आहेत. तर दि. ५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता नाट्यप्रवेशाचे सादरीकरण होणार असून यात संगीत कैकेयी, तो मीं नव्हेच, एकाच पेल्यात (मालवणी) या नाट्यप्रयोगांचा समावेश आहे. नाट्य रसिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page