श्री देव बांदेश्वर मंदिर कडील रस्त्याच्या कामाच सुधीर साटेलकर यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡बांदा ता.०२-: बांदा शहरातील श्री देव बांदेश्वर मंदिर कडील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधीर साटेलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
१५ वा वित्त आयोग निधीतून १ लाख ८५ हजार रुपये खर्चून या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, बाळु सावंत, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर, माजी सरपंच दीपक सावंत, नाना सावंत, साई धारगळकर, शैलेश केसरकर, सर्वेश मुळ्ये आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page