भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
⚡कणकवली ता.०२-: जिल्हा महिला व बाल रुग्णालय, सिंधुदुर्ग कुडाळ रुग्णालयाचे बांधकाम टप्पा- २ बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, मृद व जलसंधारण मंत्री ना.तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने सन २०१३ – १४ मध्ये जिल्हा महिला व बाल रुग्णालय, सिंधुदुर्ग कुडाळ रुग्णालयाचे बांधकाम करणेकरीता रु. १४.०० कोटी एवढी रक्कमेला मान्यता दिली असून रुग्णालयाचे सर्व बांधकाम हे मूळ आराखड्यानुसार झाले नाही म्हणून बांधकाम विभागाने रु. २३०० कोटी रकमेचे टप्पा : २ बांधकामाचे अंदाजपत्रक – शासनाने सन 2018- 19 या वर्षात सादर केले होते परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सदर कामाला प्रशासकीय मान्यता व निधी प्राप्त झाला नसल्यामुळे रुग्णालयाचे काम पूर्ण क्षमतेने सुरु न झाल्याचे समजते त्यासाठी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, सिंधुदुर्ग कुडाळ रुग्णालयाचे बांधकाम टप्पा बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता व निधी रु. २३ कोटी या वर्षात मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांचेकडे वर्ग करनेकरिता सहकार्य करावे तसेच जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग हे जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ सिंधुदुर्ग येथे कार्यरत करणेस शासनाने मान्यता द्यावी जेणेकरून कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील जनतेला आरोग्य सेवेसाठी मध्यवर्ती असलेल्या कुडाळ या ठिकाणी जिल्हा रुग्णालय सुरु राहील. तरी जनतेच्या सोयीकरीता वरील मागण्याचा विचार करून योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे.
