मडुऱ्यातील आगीत पाईपलाईनचे पाईप जळाले

बांदा : प्रतिनिधी
   मडुरा डिगवाडी येथील मोरीपूल येथे आज दुपारी अचानक आग लागली. यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनसाठी टाकलेले पाईप जळून खाक झाले. सावंतवाडी नगरपरिषदेचा अग्निशमन बंब उशिराने दाखल झाला. मात्र, तोपर्यंत आग आटोक्यात आली होती.
      आग विझविण्यासाठी माजी उपसरपंच विजय वालावलकर, पोलीस पाटील नितीन नाईक, ऋषी खर्डे यांनी प्रयत्न केला. मात्र दुपारची वेळ व वारा असल्याने आग विझविणे अशक्य झाले. या दुर्घटनेत जीवन प्राधिकरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page